CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:24 AM2020-03-31T11:24:25+5:302020-03-31T11:24:44+5:30

संरक्षक कीटचा तुटवडा असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

CoronaVirus in Washim: Protective kit shortage | CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा

CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनापासून आपले संरक्षण, डॉक्टर, नर्स आदी आरोग्यसेवकांशिवाय होऊ शकत नाही. अत्यंत घातक स्थितीमध्ये, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यसेवक तासंतास काम करत आहेत. मात्र आवश्यक असलेल्या संरक्षक कीटचा तुटवडा असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भारतामध्ये या संरक्षक साहित्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक आरोग्यसेवकांना कामचलाऊ साहित्य वापरावे लागत आहे. कोरोना विषाणूसंदर्भातील रुग्णांवर उपचार करताना काही डॉक्टरांना भारतात जीव गमवावा लागला. यामुळे वाशिम जिल्हयासह ईतरही काही जिल्हयातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. प्रशासनाकडे संरक्षण किट द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली व रुग्णसेवा लक्षात घेता २७ मार्चपासून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केलेत परंतु संरक्षक कीट मात्र प्राप्त झाली नाही. अनेक आरोग्यसेवकांना कामचलाऊ साहित्य वापरावे लागत आहे. काही सेवक मोठ्या आकाराच्या ‘बायोडिग्रेडेबल’ पिशव्या चेहरा झाकण्यासाठी वापरत आहेत .
आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्त्यव्य आहे. ते सुरक्षित राहू शकतात, जर त्यांना उच्च दर्जाचे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट’ (संरक्षक कीट) (ग्लव्स, मास्क्स, गाऊन, हेल्मेट, डोळे संरक्षक चष्मा इत्यादी) उपलब्ध असेल तर.
याकडे प्रशासनाने, आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

रुग्णसेवा देताना डॉक्टरांना संरक्षक किट आवश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध नाही. मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध झाली तर आयएमएतर्फे किट खरेदी करण्याचा मानस आहे. संरक्षक किटबाबत जिल्हा प्रशासनाशी सकारात्मक चर्चा केली आहे.
- डॉ. अनिल कावरखे
जिल्हा अध्यक्ष , आयएमए वाशिम

Web Title: CoronaVirus in Washim: Protective kit shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.