CoronaVirus in Washim : दुसरा अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:44 PM2020-04-18T14:44:53+5:302020-04-18T14:45:01+5:30

दुसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर २४ तासानंतरचा तिसरा अहवाल मात्र ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.

CoronaVirus in Washim :Second report negative third report Positive | CoronaVirus in Washim : दुसरा अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus in Washim : दुसरा अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मेडशी (ता.मालेगाव) येथील ५९ वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णाचा १५ दिवसानंतरचा दुसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर २४ तासानंतरचा तिसरा अहवाल मात्र ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून २० आणि २१ व्या दिवशी संबंधित रुग्णाचे ‘थ्रोट स्वॅब’ पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, १ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एका ५९ वर्षीय इसमाला संदिग्ध म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्यानंतर, ३ एप्रिल रोजी संबंधित रुग्णाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने मोठी खळबळ उडाली. संबंधित रुग्णावर १४ दिवस आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवून १५ व्या दिवशी त्याचा ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आला. १७ एप्रिलला हा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र पुढच्या २४ तासानंतर पाठविण्यात आलेल्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, २० आणि २१ व्या दिवशी सदर रुग्णाचा ‘थ्रोट स्वॅब’ पुन्हा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

Web Title: CoronaVirus in Washim :Second report negative third report Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.