CoronaVirus in Washim : आणखी तिघांचा मृत्यू ; ६६ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:13 PM2020-10-13T13:13:11+5:302020-10-13T13:13:19+5:30
आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली.
वाशिम : जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली.
आतापर्यंत १०५ जणांचे मृत्यू झाले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात ६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ५०३१ वर पोहोचली आहे. सोमवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सोमवारी दिवसभरात ६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवार पेठ ३, तिरुपती सिटी १, जैन चौक परिसर १, जिल्हा परिषद परिसर १, जुनी पोलीस वसाहत परिसर ३, लाखाळा ४, योजना कॉलनी परिसर १, चांडक ले-आउट परिसर १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर १, आययुडीपी कॉलनी परिसर १, माऊलीनगर १, इतर ठिकाणचा १, अनसिंग २, जांभरूण १, राजगाव १, दापुरा १, सुपखेला ४, उमरा कापसे येथील १, सावरगाव बर्डे कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसर १, अकोला फाटा परिसर १, इराळा कॅम्प परिसर १, मसला पेन येथील १, नागरतास १, आमखेडा १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, हराळ येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे १०, कवठळ येथील २, कारंजा लाड शहरात १२, लोणी येथील १, पारवा पोहर येथील १ अशा ६६ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५०३१ वर पोहचली असून यापैकी ४२६० जणांनी कोरोनावर मात केली.