Coronavirus in Washim : आणखी तीन रुग्णांचा मृत्यू; १०७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:01 PM2020-09-03T12:01:10+5:302020-09-03T12:01:18+5:30
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १८६२ वर पोहचली आहे.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तीेन जणांचा मृत्यू झाल्याचे २ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले. दुसरीकडे दोन दिवसात तब्बल १०७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १८६२ वर पोहचली आहे.
सप्टेंबर महिन्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १ सप्टेंबर रोजी ५८ तर २ सप्टेंबर रोजी ४९ असे एकूण १०७ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी वाशिम शहरातील नंदीपेठ १, निमजगा १, परळकर हॉस्पिटल परिसर ३, चाणक्य ले-आऊट परिसर १, हिंगोली नाका परिसर १, विठ्ठलवाडी परिसर ३, गुल्हाणे हॉस्पिटल जवळील २, बाळू चौक १, दत्तनगर १, टिळक चौक परिसर ६, दोडकी १, खारोळा ३, घोटा १, रिसोड शहरातील गजानन नगर परिसर १, धोबी गल्ली परिसर ३, सराफा लाईन परिसर १, रामकृष्णनगर परिसर १, स्टेट बँक परिसर ३, समर्थनगर परिसर १, अनंत कॉलनी परिसर १, करडा १, खडकी सदार १, येवती २, मालेगाव शहरातील माळी गल्ली १, मैराळडोह २, ब्राह्मणवाडा १, मानोरा तालुक्यातील धामणी १, उमरी २, इंझोरी १, रुईगोस्ता १, मंगरूळपीर येथील मंगलधाम परिसर ३, नांदगाव १, शेलूबाजार २, कारंजा लाड शहरातील मानक नगर २, कामरगाव १ अशा ५८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. २ सप्टेंबर रोजी वाशिम शहरातील देवपेठ परिसर ६, दंडे चौक परिसर २, इंदिरा चौक परिसर १, नवीन पोलीस वसाहत परिसर १, लाखाळा परिसर १, फाळेगाव १, रिसोड शहरातील शिवाजीनगर ५, देशमुख गल्ली परिसर ३, महानंदा कॉलनी परिसर १, खडकी सदार १, किनखेडा १, मालेगाव शहरातील कुटे वेताळ परिसर १, खवले वेताळ परिसर १, पाण्याची टाकी, नागरतास रोड परिसर १, ब्राह्मणवाडा २, डव्हा ५, करंजी १, शिरपूर जैन १, मंगरूळपीर तालुक्यातील जनुना १, कारंजा लाड शहरातील कुंभारपुरा ३, अकोला अर्बन बँक जवळील १, गौतम नगर २, सराफा लाईन १, मानोरा रोड परिसर १, शिवाजी नगर १, कामरगाव ३, महागाव १ असा ४८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या १८६२ झाली असून, १३६० जणांनी कोरोनावर मात केली.
रिसोडात एक, मंगरूळपिरात दोन मृत्यू
२४ आॅगस्ट रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रिसोड शहरातील अग्रवाल भवन समोरील परिसरातील ६० वर्षीय व्यक्तीचा २ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच मंगरूळपीर शहरातील ५० वर्षीय व्यक्तीचा १९ आॅगस्ट रोजी व मंगरूळपीर येथीलच ३२ वर्षीय व्यक्तीचा १८ आॅगस्ट रोजी अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद २ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.
४७ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी २८ तर बुधवारी १९ अशा एकूण ४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १८६२ पैकी १३६० रुग्ण बरे झाले असून, त्यांना सुटी देण्यात आली. उर्वरीत ४६८ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून, रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.