CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:23 PM2020-09-06T12:23:38+5:302020-09-06T12:23:47+5:30

शनिवारी आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २०९३ वर पोहचली.

CoronaVirus in Washim: Two more die; 44 corona positive! | CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह!

CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह!

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ५ सप्टेंबर रोजी निष्पन्न झाले. दरम्यान शनिवारी आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २०९३ वर पोहचली.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये ४४ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील महात्मा फुले चौक परिसर १, तिरुपती सिटी परिसर १, गुप्ता ले-आऊट परिसर १, ध्रुव चौक परिसर १, मन्नासिंग चौक परिसर १, सिव्हिल लाईन परिसर १, आययुडीपी परिसर १, रावले नगर १, घोटा ३, शिरपुटी १, रिसोड शहरातील नगरपालिका परिसर १, कासार गल्ली येथील १, शहरातील इतर परिसरातील २, सवड ३, मांगवाडी १, किनखेडा येथील १, रिठद १, मालेगाव शहरातील ३, मंगरुळपीर शहरातील रशीद नगर परिसर १, बायपास रोड १ व इतर परिसरातील १, जनुना २, लाठी १, नांदखेडा १, कारंजा लाड शहरातील गुरुकृपा हॉटेल परिसर १, अंकुश काळे नगर १, शिक्षक कॉलनी परिसर १, मानक नगर परिसर १, तुषार कॉलनी परिसर १, जयस्तंभ चौक परिसर १, जगदंबा मंदिर परिसर १, शहरातील इतर ठिकाणचे २, प्रगती नगर १, धामणी १, मानोरा तालुक्यातील चोंडी १ अशा एकूण ४४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची एकूण संख्या २०९३ वर पोहोचली असून, त्यातील ३७ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १४७० लोक बरे झाले. शनिवारी २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता ५८५ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


वाशिम, कळंबा येथील रुग्णाचा मृत्यू
वाशिम शहरातील सुभाष चौक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा, तसेच जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कळंबा महाली येथील ७० वर्षीय व्यक्तीचा ४ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

Web Title: CoronaVirus in Washim: Two more die; 44 corona positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.