CoronaVirusinWashim : आणखी एकाचा मृत्यू; ७२ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:12 PM2020-09-15T12:12:34+5:302020-09-15T12:12:43+5:30
आणखी ७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २८७६ वर पोहचली.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रिसोड येथील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २८७६ वर पोहचली. ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी यामध्ये ७२ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसर १, सिव्हील लाईन्स परिसर ३, ध्रुव चौक परिसर १, आययुडीपी परिसर २, शिवचौक परिसर १, चामुंडादेवी परिसर २, सुंदरवाटिका परिसर २, सोनारवेस परिसर ३, शुक्रवार पेठ परिसर १, चंडिकावेस परिसर २, पोलीस स्टेशन परिसर २, समता नगर परिसर १, काळे फाईल परिसर ३, गड्डीपुरा येथील २, अनसिंग येथील १, सावरगाव येथील १, शिरपुटी येथील ३, दुधखेडा येथील १, मोठा उमरा येथील १, देवठाणा येथील १, विळेगाव येथील १, शेलगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील १, इचा-नागी येथील १, मानोरा शहरातील २, खांबाळा येथील २, मालेगाव शहरातील १८, मुंगळा येथील २, शिरपूर जैन येथील १, अमानी येथील ३, मारसूळ येथील १, रिसोड तालुक्यातील मांगुळझनक येथील १, किनखेडा येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसर १, टेलिकॉम कॉलनी परिसरातील १, शांतीनगर परिसरातील १ अशा ७२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८७६ वर पोहोचली असून, त्यातील ५४ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १९६१ लोक बरे झाले. दरम्यान, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेतली.
४६ जणांना डिस्चार्ज
सोमवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम शहरातील आययुडीपी १, रावले नगर १, देवपेठ ३, शुक्रवार पेठ १, कारागृह परिसर ३, रेखाताई शाळेसमोरील १, योजना पार्क १, दंडे चौक परिसर ७, शिव चौक परिसर १, विनायक नगर परिसर १, सौदागरपुरा परिसर १, वांगी ५, काजळंबा ४, घोटा ३, शिरपुटी १, रिसोड शहरातील १, गुलबावडी १, सवड ३, किनखेडा १, मांगवाडी १, मानोरा तालुक्यातील चोंडी १, कारंजा लाड तालुक्यातील धामणी १, मालेगाव शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर १ व इतर ठिकाणच्या २ व्यक्तींचा समावेश आहे.