रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार

By admin | Published: January 22, 2015 12:17 AM2015-01-22T00:17:07+5:302015-01-22T00:17:07+5:30

ग्रामसेवक युनियनची आयुक्तांकडे चौकशीची मागणी.

Corruption in employment guarantee scheme | रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार

रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार

Next

वाशिम: मालेगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात ग्रामसेवक युनियनच्यावतिने जिल्हाध्यक्षांनी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
पंचायत समिती मालेगाव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २0१३ -१४ व २0१४ - १५ या वर्षातील सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता तसेच मजुराऐवजी मशिनव्दारे कामे सुरू आहेत. मजुर कामावर हजर नसताना त्यांची उपस्थिती दाखवून मजुरी पत्रके काढणे, काही ठिकाणी कामे झाली नसताना सुध्दा मजुरांची उपस्थिती दाखवून बोगस मुल्यांकन करून कामाचे रकमा काढल्या जात असून हे वरिष्ठांच्या मर्जीनुसार केल्या जात असल्याचे आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील नवघरे यांनी म्हटले आहे. तसेच २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयुक्त येणार असून या विषयावर चर्चा करण्याकरीता आपल्याला बोलाविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील नवघरे यांनी दिली.
ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांनी तालुक्यात कोणत्याच ठिकाणी कामे मजुरांच्या हातून करण्यात आले नाहीत. विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीत लोकांना हाताशी धरून ही कामे केली आहेत. त्यांच्या बिले काढून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे तर मालेगाव गट विकास अधिकारी आर. एस कंकाळ यांनी मालेगाव तालुक्यामध्ये होत असलेल्या रोजगार हमी योजनेमध्ये कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसून व्यवस्थित काम केल्या जात असल्याचे सांगुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: Corruption in employment guarantee scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.