राज्यात कापूस खरेदीचा मुहूर्त डिसेंबरमध्येच!
By admin | Published: October 31, 2014 12:27 AM2014-10-31T00:27:17+5:302014-10-31T00:34:42+5:30
कापसाला बाजारात कवडीमोल भाव.
अकोला : यंदा पावसाळा लांबल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले असून, राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांची सर्व भिस्त कापूस या नगदी पिकावर आहे. परंतु यंदा हमी दराने कापूस खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतल्याने शेतकर्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
भारतात यंदा जवळपास ४ कोटी कापूस गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता असून, गतवर्षीचा ५१ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. भारतीय बाजारपेठेची गरज ३ कोटी गाठींची आहे. म्हणजे यंदा देशात जवळपास १.५ कोटी गाठी कापूस शिल्लक राहील. टक्केवारीनुसार यातील ९0 लाख गाठी निर्यात केल्या, तरी ६४ लाख कापसाच्या गाठी शिल्लक राहणार आहेत. या सर्व परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठेतील कापसाचे भाव गडगडले आहेत.
य् ा राज्यात कापूस उत्पादक सहकार पणन महासंघाच्यावतीने केंद्र शासनाने ठरविलेल्या भावानुसार कापसाची खरेदी केली जाते. यंदा कापसाला प्रति क्विंटल ४0३0 रुपये भाव जाहीर झाला आहे. पण कापूस खरेदीबाबत पणन महासंघाचा अद्याप नाफेडशी करार झाला नसून, नाफेडने ९0 दिवसांच्या आत कापूस खरेदी करण्याची अट घातल्याने यंदा पणन महासंघातर्फे डिसेंबर महिन्यात कापूस खरेदी केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठेत कापूस शिल्लक असल्याने बाजारात कापसाचे भाव पडण्याची शक्यता आहे. भावावर नियंत्रण राहावे, यासाठी राज्यात डिसेंबरमध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी यांनी सांगीतले.
*कापसाला प्रतिक्विंटल १0 हजार रूपये भाव द्या!
राज्यातील पणन महासंघाची वार्षिक सभा गेल्या महिन्यात पार पडली. या सभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, यावर्षी झालेले नुकसान आणि उत्पादन खर्च बघता शेतकर्यांना दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, असा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव त्याचवेळी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
*ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच खरेदी
दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हमी दराने कापसाची खरेदी सुरू करण्यात येते. यंदा पणन महासंघाने डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. एक ते दीड महिना कापूस सांभाळून ठेवण्याची ऐपत शेतकर्यांची नसल्याने, शेतकर्यांनी हमी दरापेक्षा कमी म्हणजेच कवडीमोल भावात कापसाची विक्री सुरू केली आहे.