दोन हजार शेतकऱ्यांची कापूस मोजणी प्रलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:39 AM2020-06-22T11:39:22+5:302020-06-22T11:39:30+5:30

१९ जूनपर्यंत २ हजार ३१९ शेतकºयांच्या कपाशीची खरेदी झाली असून, अद्यापही २०३० शेतकºयांच्या कपाशीची मोजणी प्रलंबित आहे.

Cotton procurment of two thousand farmers pending | दोन हजार शेतकऱ्यांची कापूस मोजणी प्रलंबित 

दोन हजार शेतकऱ्यांची कापूस मोजणी प्रलंबित 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लॉकडाऊननंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात चार तालुक्यात शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रावर लॉकडाऊनंतर ५३४९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ जूनपर्यंत २ हजार ३१९ शेतकºयांच्या कपाशीची खरेदी झाली असून, अद्यापही २०३० शेतकºयांच्या कपाशीची मोजणी प्रलंबित आहे.
जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात चार केंद्र आहे. त्यापैकी अनसिंग व मंगरूळपीर येथे सीसीआयकडून तर कारंजा व मानोरा येथे सीसीआयच्यावतीने फेडरेशनकडून हमीभाव दरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मध्यंतरी्च्या काळात काही दिवस अनसिंग येथील खरेदी केंद्र मशिन नादुरूस्त असल्याने बंद होते. कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनपूर्वी या चारही केंद्रावर पद्धतशीरपणे कापूस खरेदी सुरू होती. तथापि, लॉकडाऊन जारी झाल्यानंतर खरेदी बंद करावी लागली. त्यामुळे विविध जिनिंग, प्रेसिंगमधील कामगार आपापल्या गावी परतले. शासनाने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन ही कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आणि कापूस खरेदी सुरूही करण्यात आली. यात कापसाच्या खरेदीला वेग देण्यासाठी मानोरा येथे एक आणि धनज बु. येथेही एक केंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहे. तथापि, जिल्ह्यात लॉकडाऊनंतर ५३४९ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असताना त्यापैकी १९ जूनपर्यंत २ हजार ३१९ शेतकºयांच्या कपाशीची खरेदी झाली असून, अद्यापही २०३० शेतकºयांच्या कपाशीची मोजणी प्रलंबित आहे.


निकषात न बसलेल्या ८५६ शेतकºयांची नोंदणी रद्द
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी पूर्ववत झाली.यासाठी जिल्हाभरातील ५ हजार ३१९ शेतकºयांनी नोंदणीही केली. तथापि, केंद्र्रावर आणलेल्या कपाशीचा दर्जा खालावल्याने वेगवेगळ्या प्रकारची चाळणी करण्यात आली. तथापि, कापूस खरेदी योग्य नसल्याने ८५६ शेतकºयांची नोंदणी रद्द करण्यात आली

 

Web Title: Cotton procurment of two thousand farmers pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.