मानोरा येथे अखेर कापूस खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:58+5:302021-01-18T04:36:58+5:30
कापूस विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी केंद्रावर येताना खरीप हंगाम २०-२१ मधील कापूस पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला सातबारा उतारा तसेच ...
कापूस विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी केंद्रावर येताना खरीप हंगाम २०-२१ मधील कापूस पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला सातबारा उतारा तसेच शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना कापसाचे पेमेंट आरटीजीएस पद्धतीने करावयाचे असल्याने आयएफएससी कोड असलेल्या बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत व मोबाइल क्रमांक आदी दस्तावेज आणणे अनिवार्य आहे. तसेच एफएक्यू दर्जा व ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचा कापूस हमीदराने व ८ टक्के ते १२ टक्के आर्द्रतेचा कापूस कपात करून स्वीकारण्यात येईल. १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेचा कापूस स्वीकारण्यात येणार नाही, असे कळविण्यात आले आहे.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे शेतकऱ्यांनी यांनी संबंधित ठिकाणी पालन करणे आवश्यक आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या नोंदीनुसार त्यांना कापूस विक्रीसाठी आणण्याकरिता मोबाइलवर संपर्क करण्यात येत आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
................
बॉक्स :
खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी वाईगौळ येथील शेतकरी प्रकाश वानखडे यांचा कापूस मोजून घेण्यात आला. तसेच त्यांच्यासह उपस्थित इतर शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने, सचिव मनोज इंगोले, संचालक सुनील राठोड, ग्रेडर जाजू, चंदू राठोड, सोपान राठोड उपस्थित होते.