जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:02 AM2017-07-19T01:02:49+5:302017-07-19T01:02:49+5:30

कृषी विभागाची आकडेवारी: नव्वद टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली!

Cotton sowing increase in the district! | जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

Next

लोेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे वाढत असल्याने जिल्ह्यातून दरवर्षी कपाशी पेरणीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना यंदा २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी पेरल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून कळत असले तरी, मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास दीड हजार हेक्टरची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील मानोरा,मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात येत होती; परंतु लागवडीवर आधारीत भाव न मिळणे, तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणे. आदि कारणांमुळे शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवू लागले. त्यातच या पिकाचा कालावधी अधिक असल्याने रब्बी हंगामातील इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या उलट सोयाबीन हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर होती येणारे असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनवर अधिकाधिक भर देणे सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. आता यंदा सद्यस्थितीत २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यात ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. त्यात वाढ होऊ यंदा हे क्षेत्र १३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर यंदा आतार्यंत ९८० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. कारंजा तालुक्यात मात्र कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, गतवर्षी या तालुक्यात ११ हजार १०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ते प्रमाण आता ५२४७ हेक्टरवर आले आहे. तथापि, जिल्ह्याच्या सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रापैकी २००९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ४६७ हेक्टरने अधिक असल्यामुळे कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.

तृणधान्याकडे शेतकऱ्यांची पाठ
मात्र, शेतकऱ्यांनी ज्वारी , भात,बाजरी व व मका या पिकांकडे पाठ फिरविल्याने यावर्षी केवळ ५ हजार ४१८ हेक्टर आर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी करण्यात आली. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली बिनभरवशाची शेती करताना हमखास उत्पन्न देणा?्या पिकांना प्राधान्य दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.

Web Title: Cotton sowing increase in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.