मालेगाव शहरातील दारूबंदीसाठी नगरसेवकांचा पुढाकार
By admin | Published: May 9, 2017 07:36 PM2017-05-09T19:36:06+5:302017-05-09T19:36:06+5:30
दारूबंदीसाठी नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे.
मालेगाव: राज्य महामार्ग व राज्य महामार्गावरील दारूचे दुकाने बंद झाल्यानंतर काही दुकाने इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने तसेच शहरातील काही मार्ग नगरपंचायतला हस्तांतरित करण्याचा काही जणांचा प्रयत्न होत असताना शहरातील काही विविध सामाजिक संघटनासह ग्रामपंचायत ते लोकपंचायत या व्हॉटसअँप ग्रुपच्या वतीने मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन त्या विरोधात निवेदन देण्यात आले होते. आता यात नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश जवळपास सव्वा महिन्यापूर्वी दिले. त्यामुळ दारूविक्री करणाऱ्यांपैकी अनेकजण आपली दारूची दुकाने महामार्गावरून इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच अनेकजण मनाईनंतरही दारू विक्री करीत आहेत. ही बाब सामाजिक स्वास्थ्यासाठी मुळीच चांगली नसून, शहराच्या आत दारूविक्री सुरू झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यताही आहे. हे होऊ नये म्हणून शहरातील सर्व नागरिक, नगर पंचायत सदस्य, पदाधिकारी दारूबंदी चळवळीला पाठिंबा देत आहे. यात नगरसेविका शीतल उमेश खुळे, नगर सेवक मदन राऊत, नगरपंचायतच्या अध्यक्षा मिनाक्षी परमेश्वर सावंत, बांधकाम सभापती शहानुरबी सत्तारशहा, माजी सभापती रेहानबाबू चौधरी, उपाध्यक्ष गोपाल मानधने, उपसभापती कविता देवा राऊत, सभापती सरला जाधव, सभापती गजानन सारसकर, सभापती रूपाली टनमने, नगरसेवक अफसानाबी सैय्यद तसलीम, किशोर महाकाळ, चंदु जाधव, रामदास बळी (स्वामी), सुषमा अमोल सोनोने, नगरसेविका रेखा अरूण बळी व नगरसेवक संतोष जोशी यांचा समावेश आहे.