काउंट सिझर मॅटी यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:53+5:302021-01-14T04:33:53+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. माया वाठोरे, डॉ. मंगेश भाग्यवंत, वैभव वैद्य, सिध्दार्थ अंभोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकातून वाठोरे यांनी डॉ. काउंट सिझर मॅटी यांच्या कार्याची माहिती दिली. इलेक्ट्रो होमिओपॅथी खूप परिणामकारक आहे. लहान-मोठ्या आजारांवर ही पॅथी वरदान ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. माधव हिवाळे म्हणाले की, इटली हे उगमस्थान असणा-या इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पध्दतीने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती केली आहे. ही उपचार पध्दती आज अनेक देशातील वैद्यकीय क्षेत्रात विकल्प म्हणून वापरली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. वाठोरे यांनी केले.