शिरपूर येथे कोविड लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:52+5:302021-03-09T04:44:52+5:30

आरोग्य अधिकारी एस. बी. बळी, जी. डब्ल्यू. मिटकरी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणप्राप्त के. पी. गाडे व दीपाली काळे या परिचारिकांच्या ...

Covid vaccination started at Shirpur | शिरपूर येथे कोविड लसीकरणाला सुरुवात

शिरपूर येथे कोविड लसीकरणाला सुरुवात

Next

आरोग्य अधिकारी एस. बी. बळी, जी. डब्ल्यू. मिटकरी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणप्राप्त के. पी. गाडे व दीपाली काळे या परिचारिकांच्या हस्ते लसीकरण करीत आहेत. मोठ्या शहरांसह आता ग्रामीण भागातही काेविड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ८ मार्च रोजी शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रावर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरणासाठी दोनशे लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ८ मार्च रोजी कचरूलाल मुंदडा, गजानन लांडगे, शोभा लांडगे, ओमप्रकाश सोनी, आशा देशमुख, बळीराम गोरे व वसंतराव नगरनाईक यांना सपत्नीक लस टोचण्यात आली. यावेळी आरोग्य कर्मचारी गौरीशंकर पळसकर, अमर झळके, क्षितिज लांडगे हे लसीकरणासाठी आलेल्या लोकांना योग्य ते सहकार्य करीत आहेत.

Web Title: Covid vaccination started at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.