जातीवाचक शिवीगाळप्रकरणी सरपंचासह चौघांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: October 19, 2015 01:29 AM2015-10-19T01:29:48+5:302015-10-19T01:29:48+5:30
अनसिंग येथील घटना.
अनसिंग (जि. वाशिम) : पंचशील ध्वज व झेंडा पायाने तुडविण्याच्या प्रकाराला अटकाव करणार्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणार्या सावळी येथील सर पंचासह चार जणांवर अँट्रासिटी अँक्टनुसार १८ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या सावळी येथील सुलाबाई नामदेव इंगोले यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी गावातील पंचशील ध्वजाला लाथ मारून अपमानि त करण्यात आले व झेंडा जमिनीवर पाडून पायाने तुडविला. अटकाव करताना आरोपी कचरू गणेश रिनवा, प्रवीण कचरू रिनवा, सरपंच रेखा जनार्दन भोयर व जनार्दन दत्ता भोयर यांनी जातीवाचक व ईल शिवीगाळ करून धमकी दिली. फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी चार आरोपींवर भादंविच्या कलम ५0४, ५0६, ३ (१)(१0) अ.जा.ज. प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील त पास एसडीपीओ वाळके करीत आहेत.