राजुरा ग्रामपंचायतच्या तत्कालीन सचिवावर दाखल होणार गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:12 AM2017-08-15T01:12:48+5:302017-08-15T01:12:56+5:30
राजूरा : येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता केल्याची तक्रार मनीष दत्तराव मोहळे यांनी केली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने मोहळे यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, त्याची दखल घेत तत्कालीन ग्रामसचिव ए.बी. मुंढे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी १४ ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाकडे पत्र सादर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राजुरा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व सचिवाने विकासकामांत गैरप्रकार केल्याचा आरोप करताना सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी मनीष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी संबंधितांकडे केली होती. मात्र, दोन वर्षांतही या प्रकरणाची दखल न घेतल्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मोहळे यांनी दिला होता. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मालेगावच्या गटविकास अधिकार्यांना पत्र पाठवून या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तसेच मोहळे यांनाही पत्र पाठवून यासंदर्भात गटविकास अधिकार्यांना कार्यवाही करण्याचा आदेश दिल्यामुळे आत्मदहनाचा इशारा मागे घेण्याची सूचना केली होती.
उप मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशानंतर मालेगावच्या गटविकास अधिकार्यांनी विस्तार अधिकार्यांमार्फत चौकशी करून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन सचिव मुंढे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना काढण्यात आली.