जातिवाचक शिविगाळप्रकरणी ६९ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:13 PM2018-06-17T17:13:40+5:302018-06-17T17:13:40+5:30

अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या शिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला असून याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी जातिवाचक शिविगाळप्रकरणी एकूण ६९ जणांविरूद्ध १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.

Criminal cases against 69 accused in the case of Atrocity Act | जातिवाचक शिविगाळप्रकरणी ६९ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

जातिवाचक शिविगाळप्रकरणी ६९ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

googlenewsNext
ठळक मुद्देशिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला.आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिविगाळ केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

 लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या शिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला असून याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी जातिवाचक शिविगाळप्रकरणी एकूण ६९ जणांविरूद्ध १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, धम्मपाल शालिग्राम कांबळे (रा.शिरपुटी) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ठराविक एका समाजाच्या महिला १५ जून रोजी दुपारच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतसमोर असलेल्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिविगाळ केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रवि ठाकरे, महादेव ठाकरे, पांडुरंग पाटील, विनोद ठाकरे, गजानन पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह एकंदरित ६९ जणांविरूद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम १४३, १४७, १४९, ३५४,३५४ ब/४२, ४५२ अन्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: Criminal cases against 69 accused in the case of Atrocity Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.