आरोग्य सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Published: December 22, 2014 01:25 AM2014-12-22T01:25:37+5:302014-12-22T01:25:37+5:30

आरोपींमध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश.

Criminal cases filed against health worker for two | आरोग्य सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

आरोग्य सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Next

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्तव्यावर असलेल्या ४५ वर्षीय आरोग्य सेविकेने रेल्वे रुळावर चालत्या रेल्वेखाली १0 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव व महिलेचा पती विनोद काळणेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका या पदावर असलेली प्रेमा विनोद काळणे ही महिला वाशिम येथील सिव्हिल लाईन परिसरातील योजना पार्कमध्ये वास्तव्यास होती. तिने बुधवारला वाशिम ते काटा लोहमार्गावर १0 डिसेंबर रोजी रेल्वेखाली आत्महत्या केली. आरोग्य सेविकेने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या पतीने तिचा मानसिक व शारीरिक छळ केला, असा आरोप करून तिच्या पतीवर भादंविचे कलम ४९८ व ३0६ नुसार गुन्हा दाखल केला. तर, जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करा, अशा सूचना दिल्या होत्या. गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये मृतक आरोग्य सेविका काळणे यांचा समावेश होता. त्यामुळे काळणे यांनी जाधव व पती विनोद काळणे यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला. यावरून ग्रामीण पोलिसांनी भादंविचे कलम ४९८, ३0६ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Criminal cases filed against health worker for two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.