मेडशी परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:59+5:302021-06-24T04:27:59+5:30
मेडशी परिसरात गत काही वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा तुलनेने अधिक प्रमाणात वाढलेला आहे. याहीवर्षी सर्वाधिक क्षेत्रावर हेच पीक ...
मेडशी परिसरात गत काही वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा तुलनेने अधिक प्रमाणात वाढलेला आहे. याहीवर्षी सर्वाधिक क्षेत्रावर हेच पीक घेतले जात आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. असे असले तरी मध्यंतरी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देऊन १७ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेऊ नसे, असे आवाहन केले होते; परंतु त्यास न जुमानता काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपती घेतली. अनुकूल वातावरणामुळे त्यांच्या शेतातील बीजही चांगल्या प्रमाणात अंकुरले. १७ जूननंतरही अधिकांश शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. त्यानुसार, मेडशी परिसरात आजमितीस सुमारे ९५ टक्के क्षेत्रावर खरिपातील पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अंकुरलेली पिके धोक्यात सापडून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काही शेतकऱ्यांकडे ‘स्प्रिंकलर’ची सोय असल्याने यामाध्यमातून त्यांनी पिके जगविण्याची धडपड चालविली आहे.