जलयुक्त शिवारच्या निधीत कपात होणे ही गंभीर बाब - आमदार अमित झनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 07:38 PM2018-01-09T19:38:19+5:302018-01-09T19:39:30+5:30
मालेगाव (वाशिम): जलयुक्त शिवार अभियानाला भक्कम प्रतिसाद मिळत असताना शासनाकडून पाठविल्या जाणा-या निधीमध्ये मात्र कपात होत असल्याची बाब गंभीर असल्याचे मत आमदार अमित झनक यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): जलयुक्त शिवार अभियानाला भक्कम प्रतिसाद मिळत असताना शासनाकडून पाठविल्या जाणा-या निधीमध्ये मात्र कपात होत असल्याची बाब गंभीर आहे. हा एकप्रकारे अन्याय असल्याचे मत आमदार अमित झनक यांनी येथे व्यक्त केले.
येथील तहसील कार्यालयात ९ जानेवारी रोजी आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते. समितीचे पदसिध्द सचिव तथा तहसीलदार राजेश वझीरे, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार झनक म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. ही योजना गावोगावी राबविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असताना या योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केल्या जात असल्याप्रती आमदार झनक यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. जलयुक्त अभियानासंबंधीच्या इतरही विषयांवर या बैठकीत सर्वंकष चर्चा झाली.