शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा; सहभागी होण्यासाठी सहा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:56 PM2021-07-26T17:56:50+5:302021-07-26T17:57:10+5:30

Crop competition for farmers : मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै २०२१ पुर्वी व इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत.

Crop competition for farmers; Six days to participate | शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा; सहभागी होण्यासाठी सहा दिवस

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा; सहभागी होण्यासाठी सहा दिवस

googlenewsNext

वाशिम : खरीप हंगाम २०२१ साठी कृषि विभागामार्फत पीक स्पर्धेचे आयोजन केले असून, मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै २०२१ पुर्वी व इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.
पीक स्पर्धेसाठी पीक निहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत एकूण ११ पिकांचा समावेश आहे. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ राहील. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत सातबारा, ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.
 

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस
तालुका पातळीवर पहिले बक्षिस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये; जिल्हा पातळीवरील पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये तर विभाग पातळीवर पहिले बक्षिस २५ हजार रुपये, दुसरे बक्षीस २० हजार रुपये, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये याप्रमाणे राहणार आहे.

 

 

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा याकरीता पीक स्पर्धा योजना आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांना संपर्क साधता येइल.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Crop competition for farmers; Six days to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.