पीक परिस्थिती बिकट; वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:26 PM2017-11-03T15:26:27+5:302017-11-03T15:28:32+5:30
वाशिम : यावर्षीची शेतमालाची बिकट परिस्थिती आणि अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम पाहता शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार अमित झनक यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारी केली.
वाशिम : यावर्षीची शेतमालाची बिकट परिस्थिती आणि अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम पाहता शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार अमित झनक यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारी केली. यासंदर्भात जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरावर तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले.
यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकºयांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. मृग नक्षत्रात दोन-तीन वेळा हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली तर काही शेतकºयांची विलंबाने पेरणी झाली. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागला. मूग, उडीद व सोयाबीन पिकाला शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. अल्प पावसामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केले जात असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण आहे. रब्बी हंगामही यामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे जाहीर केली. यामुळे शेतकºयांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. शेतकºयांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया विद्यमान सरकारकडून शेतकºयांचा भ्रमनिरास होत आहे. शेतमालाला समाधानकारक हमीभाव नाही, कर्जमाफी ही तांत्रिक बाबीत अडकत आहे, किती जणांना कर्जमाफी मिळणार याची निश्चित आकडेवारी नाही यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. शेतकºयांच्या बिकट परिस्थितीचा विचार करून शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार अमित झनक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकºयांनी केली आहे.