वन्यप्राण्यांमुळे पीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:11+5:302021-07-09T04:26:11+5:30
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा वाशिम : अनलाॅक हाेताच बाजारपेठ पूर्वपदावर येताच दुकानांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन ...
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : अनलाॅक हाेताच बाजारपेठ पूर्वपदावर येताच दुकानांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नसल्याचे दिसून येत आहे. आता नागरिक बिनधास्त फिरताहेत.
रस्ता अरुंद ; वाहतूक प्रभावित
मालेगाव : मालेगाव शहरातील अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याच्या कडेला ऑटो, दुचाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतूक प्रभावित होत असून नागरिकांना त्रास हाेत आहे.
लाइनमन मुख्यालयी राहण्याची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजासह परिसरातील इतर काही गावांमध्ये अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत आहे. लाइनमन नसल्याने समस्या सुटत नसून ते मुख्यालयी राहत नाहीत.
पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे हाल
वाशिम: मानोरा तालुक्यात आसोला ते गव्हा या पाणंद रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने पाणंंद रस्त्याचे प्रश्न आजही प्रलंबित आहे. ग्रामस्थांना त्रास हाेत आहे.