शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:28+5:302021-07-24T04:24:28+5:30
^^^ खरडलेल्या जमिनीचे पंचनामे प्रलंबित वाशिम : जिल्ह्यात गत महिन्यात जोरदार पावसाने काही शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली ; परंतु ...
^^^
खरडलेल्या जमिनीचे पंचनामे प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात गत महिन्यात जोरदार पावसाने काही शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली ; परंतु महिना उलटून गेला तरी प्रशासनाने या जमिनीचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
^^
कोरोना रुग्णसंख्या घटताच लसीकरणाकडे पाठ
शिरपूर जैन : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत असतानाच आता कोरोना चाचणी आणि लसीकरणाकडे लोक पाठ करीत आहेत. कोरोना संसर्गाची भीती लोकांच्या मनातून कमी झाल्याने शिरपूर परिसरात २५० जणांनी लस घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
-------------
खचलेला पूल ‘जैसे-थे’
वाशिम : अडाण प्रकल्पाच्या क्षेत्रात येत असलेल्या इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल गतवर्षी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. दोन महिने उलटले तरी, या पुलाची दुरुस्त करण्यात आली नाही.
----------------
धनज परिसरात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी ; तर तापत्या उन्हात घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
-----------------