पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 02:50 PM2018-07-29T14:50:42+5:302018-07-29T14:53:07+5:30

Crop Damage: Financing of 1508 farmers in five districts is pending | पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

Next
ठळक मुद्देअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून रविवारी मिळाली.
माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने या नुकसानाची संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे शासनाकडून प्रचलित दरानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून १० जुलै रोजी रक्कमही मंजूर केली. प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११५८ शेतकºयांचे ६२४.६७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील २५५ शेतकºयांचे ११५.६३ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यातील ७३ शेतकºयांचे २६.०४ हेक्टर अकोला जिल्ह्यातील २० शेतकºयांचे १०.७० हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यातील २ शेतकºयांचे १.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पाचही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. सदर मदतीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयास पूर, चक्रीवादळ, पीक नुकसान, तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी उपलब्ध तरतुदीतून करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधित अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानासाठी आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली आहे; परंतु आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.
- बाळासाहेब बोराडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

 

Web Title: Crop Damage: Financing of 1508 farmers in five districts is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.