कर्जदार शेतकऱ्यांसाठीही पीक विमा योजना ऐच्छिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:38+5:302021-07-03T04:25:38+5:30
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा पीकविमा योजनेत समावेश असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ...
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा पीकविमा योजनेत समावेश असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू राहणार आहे. योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्का व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे.
..............................
सामूहिक सुविधा केंद्र, बँकेत सादर करता येईल विमा हप्ता
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रस्तावासोबत सातबारा, आधार कार्ड, पीक पाहणी झाली असल्यास त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
..................
या नुकसानालाही मिळणार भरपाई
प्रधानमंत्री पीकविमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे आदींमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसानभरपाई ठरविली जाईल.
...............
७२ तासात माहिती देणे आवश्यक
योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय संस्था, विमा कंपनी, कृषी किंवा महसूल विभागास किंवा टोल फ्री नंबरद्वारे कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे.
..................
कपाशीचा विमा हप्ता सर्वाधिक
सोयाबीन - ४५,०००/९००
कापूस - ४३,०००/२,१५०
तूर - ३१,५००/६३०
मूग व उडीद - १९,०००/३८०
खरीप ज्वारी - २५,०००/५००
विमा संरक्षित रक्कम/ पीकविमा हप्ता