पिककर्ज वाटपास प्रारंभ; ७१७ सभासदांना ६ कोटींचे कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 04:34 PM2019-04-19T16:34:25+5:302019-04-19T16:34:34+5:30
कारंजा : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला असून कारंजा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ शाखांमधील ७१७ सभासदांना ५ कोटी ९९ लाख ९ हजार रूपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात पात्र सभासद शेतकºयांना १६ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता पिककजार्चे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड , बँकेचे वरीष्ठ निरीक्षक डी. एम . वानखडे, धनज शाखा निरीक्षक एम .आर. महल्ले, कामरगाव शाखा निरीक्षक पी. एन .जाधव, कारंजा शाखा निरीक्षक जी. डी .उजाडे, एस .बी .देशमुख व उंबडार्बाजार शाखा निरीक्षक बी. एस. मोहीते यांच्यासह बँक कर्मचाºयांची व पात्र सभासद शेतकºयांची उपस्थिती होती. कारंजा तालुक्यात कारंजासह कामरगाव, मनभा, उंबडार्बाजार, काजळेश्वर, पोहा व धनज अशा ७ ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे पसरले असून स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पात्र श्ोतकरी सभासदांना दरवर्षी खरीप पिककजार्चे वाटप करण्यात येते. अध्यापपर्यंत दुसºया एकाही बँकेने पिककजार्चे वाटप न केल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पात्र शेतकरी सभासदांना पिककर्ज वाटप केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयातून उमटत आहे. खरीप पिककर्ज वाटपात पारदर्शकता यावी या उद्देशाने पिककजार्चे वितरण हे एटीएम कार्डद्वारे करण्यात येते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एटीएम कार्ड येण्यास उशिर झाल्याने पिककजार्तील अर्धी रक्कम सभासद शेतकºयाच्या बचत खात्यात वळती करण्यात आल्याने ऐन गरजेच्यावेळी पैसा कामी पडल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान स्पष्टपणे झळकत होते. आतापर्यंत एकुण ६६१ सभासदांना एटीएम कार्ड प्राप्त झाले असून एटीएम कार्डद्वारे शेतकºयांनी पिककजार्ची रक्कम काढणे सुरू केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील आतापर्यंत ७४ टक्के कर्ज वसुली केली आहे. तर काही शेतकºयांची कर्जमाफी झाल्याने ते शेतकरी सुध्दा नवीन पिककर्ज घेण्यास पात्र ठरले आहे.
एकंदरीत ऐन अडचणीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतीमशागतीच्या दृष्टीने पिककर्जवाटप केल्याने शेतकºयातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.