पीककर्ज ‘एटीएम’ कार्डच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:16 PM2019-04-17T15:16:41+5:302019-04-17T15:16:56+5:30
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यात हजारो शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळालेच नाहीत, तर हजारो शेतकºयांचे एटीएम कार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे या शेतकºयांचा खरीप हंगाम वांध्यात सापडला आहे.
शेतकºयांना वेळेवर आणि सहजपणे विविध कर्ज उपलब्ध करण्यासह, आकस्मिक खर्चाच्यावेळी सहज रक्कम मिळावी म्हणून शासनाने किसान क्रेडीट कार्ड योजना अमलात आणली आहे. या योजनेमुळे शेतकºयांना बँकांचे व्यवहार बंद असले तरी, खात्यात जमा झालेली पीककर्जासह इतर योजनांच्या अनुदानाची रक्कम काढणे शक्य होणार आहे. तथापि, यंदाच्या पीककर्ज वितरणात ही योजना अडचणीची ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात विविध बँकांचे मिळून एकूण १ लाख १२ हजार ५८५ शेतकरी असून, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खातेदार शेतकºयांची संख्या १ लाख ५८ हजार ३६१ एवढी आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी पीककर्ज काढण्याच्या तयारीत असून, त्यांनी बँकेकडे कागदपत्रेही सादर केली आहेत. त्यातील बहुतांश शेतकºयांना पीककर्जही मंजूर झाले आहे. तथापि, पीककर्जातील रक्कम ही किसान के्रडीट कार्डद्वारेच काढण्याची अनुमती आहे. आता शेतकºयांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकांकडे धाव घेत आहेत. तथापि, जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांत खाते असलेल्या एकूण १ लाख ५८ हजार ३६१ शेतकºयांपैेकी केवळ ९९ हजार २६८ शेतकºयांचे किसानकार्ड बँकांना प्राप्त झाले आहेत, तर त्यातील केवळ २८ हजार ९८२ शेतकºयांचे किसान कार्ड क्रियाशील झाले असून, अद्याप ४३ हजार ८९० शेतकºयांचे किसान कार्ड अप्राप्तच आहेत. त्यामुळे या शेतकºयांना आता किसान कार्ड मिळाल्यानंतर पीककर्जाची रक्कम काढता येणार आहे.
दरम्यान यावर्षी १५३० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता उर्वरीत राष्ट्रीयकृत बॅकेने अद्याप पीककर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार पीककर्जाची निम्मी रक्कम उचलण्यासाठी विड्रॉल स्लीपचा पर्याय ठेवला आहे.; परंतु निम्म्या रकमेसाठी किसान क्रेडीट कार्डचा आधार आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदार शेतकºयांचे किसान कार्ड प्रलंबित असल्याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून तात्काळ प्रक्रिया राबविण्याची सुचना केली असून, शेतकºयांची अडचण दूर करण्यासाठी येत्या ८ दिवसांत सर्व खातेदारांना किसान कार्डचे वितरण होईल.
-दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक जिल्हा
अग्रणी बँक वाशिम.
वाशिम तालुक्यातील ४ हजार सभासदांसाठी किसान क्रेडीट कार्डची मागणी जिल्हा बँकेकडे करण्यात आली आहे; परंतु केवळ ३०० कार्ड प्राप्त झाले असून, किसान कार्ड मिळत नाही, तोपर्यंत निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारे देण्यात येईल. उर्वरित निम्मी रक्कम किसान कार्डद्वारेच काढावी लागणार आहे.
- एस. पी. तलवारे
वरिष्ठ निरीक्षक
जिल्हा मध्यवर्ती बँक, वाशिम
वाशिम तालुक्यात केवळ ३०० शेतकºयांना कार्ड
शासनाने पीककर्ज अथवा इतर योजनांतील रक्कम काढण्यासाठी किसान के्रडीटकार्ड योजना आणली असली तरी, हे कार्ड मिळण्यास विलंब होत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकट्या वाशिम तालुक्यात केव्ळ ३०० शेतकºयांना नवे एटीएम प्राप्त झाले, तर ४००० हजार एटीएम कार्ड प्रलंबित असून, कर्ज मंजूर झालेल्या हजार शेतकºयांचे एटीएम कार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, बँकेने तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारे
शेतकºयांच्या सुविधेसाठी किसान के्रडीट कार्ड योजना राबविण्यास सुरुवात केली. ही बाब शेतकºयांच्या सोयीची असली तरी, क्रेडीटकार्डच मिळाले नसल्याने शेतकºयांना अडचणी येत आहेत. शेतकºयांची तातडीची अडचण दूर करण्यासाठी निम्मी रक्कम विड्रॉल स्लीपद्वारे काढण्याची अनुमती शेतकºयांना देण्यात आली आहे. तथापि, विड्रॉलसाठी बराच विलंब लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यातच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया संथ असल्याने शेतकºयांना थेट विड्रॉलद्वारे रक्कम मिळण्यासही विलंब होणार असल्याने शेतकºयांचा खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे.