‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:10 PM2020-02-10T18:10:43+5:302020-02-10T18:10:50+5:30

लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Crop loan will also be available to beneficiaries of PM Kissan scheme | ‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असणाºया ज्या शेतकºयांनी अद्यापपर्यंत कुठल्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा ६० हजार ३०९ शेतकरी लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शीयल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सोमवार, १० फेब्रूवारी रोजी दिली.
जिल्ह्यात २ लाख १७ हजार १९४ शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असून, वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकाकडून त्यापैकी १ लाख ५६ हजार ८८५ लाभार्थी शेतकºयांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तथापि, कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे ६० हजार ३०९ लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये आहेत. अशा शेतकºयांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शीयल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकºयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता यावा, याकरिता आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकºयांनी अर्जासोबत शेतीचे उतारे आणि कर्ज घेतले नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेतून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज न घेणाºया प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्ज प्रोसेसिंग शुल्क आणि निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे.
परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत संबंधित शेतकºयांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. ही विशेष मोहीम २५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या आहेत.

Web Title: Crop loan will also be available to beneficiaries of PM Kissan scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.