पिकांत डवरणी, खुरपणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:58+5:302021-07-19T04:25:58+5:30

---------- इंझोरीमध्ये आठ हजार हेक्टरवर पेरणी वाशिम : मृग नक्षत्रातील पावसाच्या भरवशावर इंझोरी सर्कलमधील शेतकऱ्यांनी वेगाने खरीप पेरणी केली. ...

Crop rotation, start weeding | पिकांत डवरणी, खुरपणीला प्रारंभ

पिकांत डवरणी, खुरपणीला प्रारंभ

Next

----------

इंझोरीमध्ये आठ हजार हेक्टरवर पेरणी

वाशिम : मृग नक्षत्रातील पावसाच्या भरवशावर इंझोरी सर्कलमधील शेतकऱ्यांनी वेगाने खरीप पेरणी केली. त्यानंतर पावसाची साथ मिळाल्याने इंझोरी सर्कलमध्ये ८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या १०० टक्के आहे.

============

जि.प. शाळेच्या वर्गखोल्या नादुरूस्त

वाशिम : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ६० वर्गखोल्या नादुरूस्त आहेत. दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरूस्ती करून संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शनिवारी केली.

--------------------

शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा कायम

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी संपत आली तरी कामरगावसह परिसरातील एक हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

^^^^^^

Web Title: Crop rotation, start weeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.