वाशिम जिल्ह्यात गारपिटीने ४ ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:03 PM2021-03-22T12:03:54+5:302021-03-22T12:04:02+5:30
Crops on 4880 hectares damaged by hail in Washim district जिल्ह्यातील ६ हजार ६९७ शेतकºयांना मोठा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १९ मार्च रोजी रात्री वादळीवाºयासह गारपिट झाली. या नैसर्गिक संकटामुळे ४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यात जिल्ह्यातील ६ हजार ६९७ शेतकºयांना मोठा फटका बसला असून महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
१९ मार्च रोजी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांकडून प्राप्त माहितीवरून एकत्रित प्राथमिक अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील वाशिम, कोंडाळा झामरे, नागठाणा, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, अनसिंग या महसूल मंडळात १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या मंडळांतर्गत येणाºया गावांमधील २१२३ शेतकरी यामुळे बाधीत झाले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, मुंगळा, करंजी, चांडस व शिरपूर महसूली मंडळात ११३२ हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेवगा, पपई व सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला. यामुळे १८०० शेतकºयांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील केनवड व गोवर्धन महसूली मंडळात १४७६ हेक्टरवरील कांदा, पपई, उन्हाळी मूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन १८९३ शेतकरी बाधीत झाले. मंगरूळपीर तालुक्यात आसेगाव महसूली मंडळात ४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, रबी ज्वारी, मूग, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन ९६ शेतकºयांचे नुकसान झाले; तर मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदुरजना, गिरोली व उमरी बु. महसूली मंडळात ५३१ हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून ८६५ शेतकºयांना फटका बसल्याचे प्रशासनाने प्राथमिक अहवालामध्ये नमूद केले आहे.