थंडीमुळे पाच गावातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:00 PM2019-01-04T13:00:12+5:302019-01-04T13:00:58+5:30

वाकद (वाशिम) : गत दोन दिवसांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील वाकद, बाळखेड, गोहोगाव, एकलासपूर व धोडप येथील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

crops damaged due to cold weather | थंडीमुळे पाच गावातील पिकांचे नुकसान

थंडीमुळे पाच गावातील पिकांचे नुकसान

Next

लोकमतन न्यूज नेटवर्क
वाकद (वाशिम) : गत दोन दिवसांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील वाकद, बाळखेड, गोहोगाव, एकलासपूर व धोडप येथील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये हरभरा व हळद पिकांचा समावेश असून कृषी विभागाने या भागाचा सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.
थंडीचे प्रमाण गत काही दिवसात वाढल्याने शेतातील हरभरा पिकाचे दाणे काळसर झाले असून हळदही करपल्यासारखी झाली आहे. अगोदरच पावसाअभावी अनेकांचे बियाणे उगवलेच नाही त्या ज्या शेतकºयांनी धडपड करुन पीक जगवले त्यातही नुकसान झाल्याने याचा विपरित परिणाम उत्पादनावर होणार आहे. याचा मोठा फटका शेतकºयांना बसणार असल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. शेतकºयांनी मोठया मेहनतीने व श्रमाने पीक जगविण्याचा प्रयत्न केला परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकºयांनी केलेले नियोजन कोलमडले. आता हाती येणाºया उत्पादनातून लावलेला खर्च तरी निघेल की नाही या चिंतेत शेतकरी पडला आहे. यासंदर्भात परिसरातील शेतकºयांनी कृषी अधिकाºयाची भेट घेवून त्यांना याबाबत माहिती दिली. तसेच या भागाच्या नुकसानाचे सर्वेक्षण करावे व शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title: crops damaged due to cold weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.