पिकांना पावसाची प्रतीक्षा !

By admin | Published: July 3, 2017 08:03 PM2017-07-03T20:03:57+5:302017-07-03T20:03:57+5:30

कारंजा - अन्य तालुक्याच्या तुलनेत कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती वाईट आहे तसेच पेरणीदेखील कमी झाली आहे.

Crops wait for rain! | पिकांना पावसाची प्रतीक्षा !

पिकांना पावसाची प्रतीक्षा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा - अन्य तालुक्याच्या तुलनेत कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती वाईट आहे तसेच पेरणीदेखील कमी झाली आहे. १ जुलैपर्यंत कारंजा तालुक्यात केवळ ४३ टक्के पेरणी झाली आहे. 
जिल्ह्यातील तालुकानिहाय पीक पेरणी अहवालावर नजर टाकली तर कारंजा तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाल्याचे दिसून येते. कारंजा तालुक्यात समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने ह्यरिस्कह्ण नको म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली नाही. कारंजा तालुक्यात ६७ हजार ४६९ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे.  यापैकी ४३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसात सातत्य नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. उर्वरीत क्षेत्रावर पेरणी होण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

 

Web Title: Crops wait for rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.