स्वामी सर्मथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By admin | Published: June 7, 2014 10:42 PM2014-06-07T22:42:48+5:302014-06-07T22:50:47+5:30

स्वामी सर्मथ महाराज पालखी दर्शन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाला भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती

The crowd of devotees for the visit of Swami Sarmath | स्वामी सर्मथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

स्वामी सर्मथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

वाशिम: दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोटची ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज पालखी परिक्रमा वाशिम शहरात ७ जून रोजी सकाळी १0 वाजता दाखल झाली यावेळी ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज पालखी दर्शन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाला भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ङ्म्री स्वामी सर्मथ भक्त मंडळाने परिङ्म्रम घेतले.
ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट ङ्म्री स्वामी सर्मथ पालखी परिक्रमेचे हे १८ वे वर्ष आहे. ङ्म्री स्वामी सर्मथ अन्नछत्रमंडळ १९८८ साली स्थापन झाले असून दैनंदिन दोन्ही वेळेस रोज हजारो भाविक भक्तांना अन्नदान मोफत दिला जातो. भक्तांकरीता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २0 कोटी रूपयांच्या भव्य प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या मंडळाची पालखी सोहळयास शेकडो भाविकांची उपस्थिती दरवर्षी लाभते.
वाशिम येथील परशुराम भवनात ७ जून रोजी सकाळी १0 वाजता पालखीचे आगमन झाल्याबरोबर पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीस दर्शनासाठी ठेवले असता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडु शर्मा, गोपाल शर्मा, बाळु पोहरे, बंडु धामणे, राजु इंगळे, विठ्ठल ङ्म्रेमेवार, क्रिष्णा काठोळे, विजय वानखेडे, बाळु अग्रवाल, सतिष बकाले, विनोद ब्रम्हेकर, नारायण कडवे, गणेश गाभणे, सततु ठाकुर, भागवत खाजबागे, दिलीप खोडके, ज्ञानेश्‍वर देशमुख, शाम ठाकुर, मनोज बरेटी, गफ्फार भाई, नामदेव काळे, लक्ष्मण भालेराव, आशीक अली, फराण खान, गणेश गिरी, जुम्मा उदीवाले, वैभव अंभोरे, बंडु गांजरे, सुरेश गाभणे, रामेश्‍वर राऊत, राजेश सिसोदीया यांच्यासह ङ्म्रीस्वामी सर्मथ भकत मंडळांनी परिङ्म्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The crowd of devotees for the visit of Swami Sarmath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.