संचारबंदी संपताच बाजारपेठेत उसळली गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:32+5:302021-03-09T04:44:32+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जमावबंदीच्या आदेशाला १५ मार्चपर्यंत ...

Crowd erupts in market as soon as curfew is lifted! | संचारबंदी संपताच बाजारपेठेत उसळली गर्दी !

संचारबंदी संपताच बाजारपेठेत उसळली गर्दी !

Next

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जमावबंदीच्या आदेशाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून, या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडिकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवासी वाहतूक व ऑटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेली संचारबंदी सोमवारी सकाळी ७ वाजता संपली. त्यामुळे सकाळी ९ वाजतापासून बाजारपेठ पूर्ववत होताच नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील बाजारपेठेतही गर्दी झाली. दरम्यान, मास्कचा वापर करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे सोमवारी वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत दिसून आले.

Web Title: Crowd erupts in market as soon as curfew is lifted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.