'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:09 PM2020-05-12T17:09:04+5:302020-05-12T17:09:09+5:30
र्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे.
रिसोड/शिरपूर : कोरोना विषाणूचा संसबँकांसमोरील गर्दी हटता हटेना !र्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. तथापि, काही नागरिकांकडून अद्याप आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे मंगळवार, १२ मे रोजी रिसोड व शिरपूर येथील बँकांसमोरील गर्दीवरून दिसून आले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रूग्ण आहे. तथापि, सावधगिरीचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे शासन आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बँकांनी व्यवहार ठेवावे, नागरिकांनी बँकेत किंवा बँकेसमोर गर्दी करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने बँक तसेच नागरिकांना वारंवार दिल्या आहेत. काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत गर्दी टाळली जाते; मात्र, तीन, चार दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. मंगळवार, १२ मे रोजी रिसोड येथील काही राष्ट्रीयकृत बँकेसमोर नागरिकांची तसेव विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी शिरपूर येथे विद्यार्थ्यांची बँकेसमोर गर्दी झाल्याचे दिसून आले. विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे. रिसोड शहरातील काही बँकांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविण्यात आले नाही. त्यामुळे एका मागोमाग एक असे नागरीक उभे असल्याचे १२ मे रोजी दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसºयाला होत असल्यामुळे नागरिकांनीदेखील स्वत:हून काळजी घेऊन गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, काही नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे बँकांसमोरील व बँकांमधील गर्दीवरून दिसून येते.