कारंजात कोविड लसीकरण केंद्रावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:13+5:302021-05-09T04:42:13+5:30
कारंजा शहरात मुलजी जेठा हायस्कूल व विवेकांनद शाळा या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र जिल्हा ...
कारंजा शहरात मुलजी जेठा हायस्कूल व विवेकांनद शाळा या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र जिल्हा स्तरावरून अपेक्षित प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नसल्याने पुरता गोंधळ उडत आहे.
ज्या नागरिकांनी १ मे रोजी लस मिळण्याकरिता ऑनलाईन स्वरूपात नोंदणी केली, त्यांना शनिवारी लस मिळणे अपेक्षित होते; परंतु लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीत अनेकांची नावेच आली नाहीत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. संबंधितांना लस न घेताच आल्यापावली परत जावे लागले. त्यामुळे रीतसर नोंदणी करूनही उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांना शनिवारी लस मिळणार होती, त्यांना आता कधी लस मिळणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
..................
कोट :
ज्या नागरिकांना शनिवारी लसीकरण करून घेण्यासंबंधीचा ‘मेसेज’ आला; मात्र त्यांचे यादीत नाव आले नसल्याने त्यांना लस देता आली नाही. लसीकरणासाठी कार्यान्वित साॅफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ही अडचण निर्माण झाली असून, संबंधितांना पुन्हा ‘मेसेज’ येईल. त्यानंतर त्यांचे लसीकरण केले जाईल.
- धीरज मांजरे
तहसीलदार, कारंजा