कोरोना चाचणीसह अहवालासाठी गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:48+5:302021-03-14T04:36:48+5:30

जिल्ह्यात १२ मार्चपर्यंत एकूण १०,९०४ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यानच्या काळातच ३,७६० व्यक्तींना ...

Crowd for report with corona test; The fuss of physical distance | कोरोना चाचणीसह अहवालासाठी गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंचा फज्जा

कोरोना चाचणीसह अहवालासाठी गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंचा फज्जा

Next

जिल्ह्यात १२ मार्चपर्यंत एकूण १०,९०४ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यानच्या काळातच ३,७६० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. अर्थात जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी ३३ टक्क्यांहून अधिक व्यक्ती अवघ्या ४० दिवसांतच कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळेच जिल्ह्यात कोरोना चाचणीकडे नागरिकांचा कल वाढल्याने कोरोना चाचणीसह अहवालासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. तथापि, या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळत आहे.

-----------------

गर्दीवर नियंत्रणासाठी कारवाईचा उपाय

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी आता कोरोना चाचणीसाठी मोठी गर्दी होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीसह चाचणीचा अहवाल घेण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यासह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

----------

कोट : कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव व्हावा आणि आपल्यामुळे इतरांनाही धोका होऊ नये म्हणून चाचणी करण्याचा निर्णय घेतला; परंतु येथे चाचणीला येणाऱ्या लोकांना बसण्याची किंवा सामाजिक अंतराने दूर राहण्यासाठी व्यवस्थाच केली नसल्याने जागा मिळेल तेथे उभे राहावे लागत आहे.

-रामराव ठाकरे,

--------------

कोट : वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेऊन स्वत: चाचणी करण्याचे ठरविले. चाचणी करण्यासाठी आल्यानंतर येथे थांबण्याची किंवा बसण्याची कोणती सुविधाच नसल्याचे दिसले. चाचणी लवकर व्हावी म्हणून या ठिकाणी आधीच असलेल्या लोकांच्या मागे आपल्याला ताटकळत उभे राहावे लागले.

-गणेश कांबळे,

--------------

कोट : कोरोना संसर्गामुळे आपला आणि आपल्यापासून इतरांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी कोरोना चाचणी करून घेतली ; परंतु चाचणी करण्यासाठी आल्यानंतर येथे प्रशासनाकडून कोणतीच स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली नसल्याचे आढळून आले. चाचणीसाठी आलेले सर्वच फाटकासमोर उभे होते.

- दयाराम पाटील

-----------

कोट : कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. ते प्रत्येकाला फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याच्या सूचना करतात. प्रसंगी दम ही देतात ; परंतु नागरिक नियमांचे पालन करण्याची तसदीच घेत नाहीत. आता या ठिकाणी तीन मीटर अंतर राखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह ज्येष्ठांना बसण्याची सुविधाही करू.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.

१) एकूण कोरोना बाधित - १०,९०४

२) बरे झालेले -९,५१२

३) एकूण कोरोना बळी १६४

४) उपचार सुरू असलेले -१,२२७

५) जणांची दररोज तपासणी -१,३५०

Web Title: Crowd for report with corona test; The fuss of physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.