क्रीडा संकुल येथे गर्दी कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:31 AM2021-02-19T04:31:02+5:302021-02-19T04:31:02+5:30
०० आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा वाशिम : कोरोनाविषयक स्थिती आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर ...
००
आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम : कोरोनाविषयक स्थिती आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दि. १८ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची चाचणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
०००००
लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा
वाशिम : रमाई आवास योजनेंंतर्गत गतवर्षात घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणार्या लाभार्थींच्या बँक खात्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम जमा केली जात असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे यांनी गुरुवारी सांगितले.
०००
बँकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
रिसोड : कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे सर्वांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रिसोड येथील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने या निर्देशाचे पालन होत नसल्याचे गुरुवारी दिसून आले.
०००
वाहनचालकांची तपासणी मोहीम
मालेगाव : तिबल सीट, विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मालेगाव पोलीस स्टेशनच्या चमूतर्फे केली जात आहे. दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोषी आढळून आलेल्या जवळपास ७८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.