पीककर्जासाठी बँकेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:21+5:302021-07-05T04:25:21+5:30
---------- केनवड परिसरात ९५ टक्के पेरणी वाशिम : केनवड परिसरात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ४ ...
----------
केनवड परिसरात ९५ टक्के पेरणी
वाशिम : केनवड परिसरात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत जवळपास ९८ टक्के शेतकऱ्यांची पेरणी आटोपली असून, यावर्षीही सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे.
-----------
पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी
वाशिम : १० व १२ जून रोजीच्या पावसामुळे रिठद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी २ जुलै रोजी महसूल व कृषी विभागाकडे केली.
----
सामाजिक सभागृहाची इमारत शिकस्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील अतिशय जुन्या सामाजिक सभागृहाची इमारत पूर्णपणे शिकस्त झाली आहे. गतवर्षी पावसामुळे या सभागृहाची एक भिंत कोसळली. या ठिकाणी नवी इमारत बांधण्याची मागणी आहे.
-----
वर्षभरातच रस्त्याची दुरवस्था
काजळेश्वर उपाध्ये : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्षभरापूर्वी पूर्ण झालेल्या जानोरी ते शहा फाटामार्गे पानगव्हान, उकर्डा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्ताकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
--------
किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शनाचा अभाव
वाशिम : खरीप हंगामातील पिके वितभर वाढली असतानाच या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. तथापि, या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा अभाव इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांना जाणवत आहे
^^^^^
कनेक्टिव्हिटीअभावी धनजचे शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.
--------