वाढत्या कोरोना संसर्गातील एसटीत प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:57+5:302021-02-21T05:18:57+5:30

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड, असे हे ...

Crowds of commuters in the estuary with increasing corona infection | वाढत्या कोरोना संसर्गातील एसटीत प्रवाशांची गर्दी

वाढत्या कोरोना संसर्गातील एसटीत प्रवाशांची गर्दी

Next

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड, असे हे चार आगार असून, या चार आगारांतून पुणे, औरंगाबाद, नागपूर ते मुंबई या महानगराकडे दर दिवशी हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. कोरोना संसर्ग काळात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली होती, तर लॉकडाऊन काढल्यानंतरही जवळपास दोन महिने एसटीच्या प्रवासी संख्येला प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळ डबघाईस आले होते. त्यानंतर मात्र एसटीच्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभू लागला. जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक प्रवासी दर दिवशी एसटीने प्रवास करू लागले. आता मात्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रवासी संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत होती. प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यात त्या उलट स्थिती असून, शनिवारपर्यंतही जिल्ह्यात एसटीने प्रवास करणा-यांची संख्या कमी न झाल्याने एसटीत बसण्यासाठीही जागा मिळेनासी झाल्याचे दिसत आहे.

----------------

औरंगाबाद मार्गावर प्रवासी संख्या घटली

* वाशिम जिल्ह्यातील चारही आगारातून नागपूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी महानगरांत मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात.

* कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जवळपासच्या जिल्ह्यात एसटी प्रवाशांच्या संख्येवर कोणताही परिणाम झाला नसला तरी, औरंगाबाद, मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. महानगरातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने या महानगरांत जाण्यास जिल्ह्यातील लोक मागेपुढे पाहत आहेत.

----------------

आठ मार्गावर एसटी बंद

* जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसफे-या धावत असल्या तरी ग्रामीण भागांतील ८ मार्गावर एसटीच्या बसफे-या बंद आहेत.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * *जिल्ह्यातील आगारात बसगाड्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध गाड्यांतून नियोजन केले जात असल्याने कमी प्रवासी असलेल्या ८ ग्रामीण मार्गावरील बसफे-या बंद आहेत.

---------------

ना मास्क, ना डिस्टन्सिंग

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिका-यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तथापि, एसटीचे काही वाहक, चालक आणि अनेक प्रवासी मास्क वापरत नसून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नसल्याचे चित्र बसस्थानक आणि एसटीत दिसत आहे.

------------

जिल्ह्यात एसटीने रोज प्रवास करणा-यांची संख्या

७,०००

लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या

९००

एसटी सध्या प्रवास करणा-यांची संख्या

६,८००

Web Title: Crowds of commuters in the estuary with increasing corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.