पीक विमा अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:52 PM2019-10-30T14:52:53+5:302019-10-30T14:53:03+5:30
पीक विमा योजनेत सहभाग नोंदविणाºया शेतकºयांना पिकांच्या नुकसानाची तक्रार ४८ तासांच्या आत करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पीक विम्याचे अर्ज सादर करण्यासाठी बुधवारी शेतकºयांनी एकच गर्दी केली.
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठाण मांडल्याने सोयाबीन, तूर, कपाशी व फळबागेचे नुकसान झाले आहे. पीक विमा योजनेत सहभाग नोंदविणाºया शेतकºयांना पिकांच्या नुकसानाची तक्रार ४८ तासांच्या आत करावी लागणार आहे. शेतकºयांना संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी, ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेत अथवा संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, पीक विमा भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. नुकसानभरपाई मिळावी याकरीता बुधवारी वाशिम तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी एकच गर्दी केली.