काेराेना चाचणीच्या ठिकाणीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:25+5:302021-03-16T04:41:25+5:30
वाशिम नगर परिषदेच्यावतीने व्यापाऱ्यांसाठी काेराेना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले व त्या पध्दतीने नियाेजनही केले. व्यापाऱ्यांसाठी व दुकानात काम ...
वाशिम नगर परिषदेच्यावतीने व्यापाऱ्यांसाठी काेराेना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले व त्या पध्दतीने नियाेजनही केले. व्यापाऱ्यांसाठी व दुकानात काम करणाऱ्या व्यक्तिंसाठी केमिस्ट भवन व सरदार वल्लभभाई पटेल शाळेत नियाेजन करण्यात आले आहे. परंतु शहरातील नागरिकांना काेराेना चाचणी करण्याच्या ठिकाणी नागरिकांची माेठी गर्दी हाेत असून, येथे सर्व काेराेना नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना काेराेना चाचणी करण्यासाठी तासनतास थांबण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकामध्ये काेराेनाची लक्षणे दिसून येतात, असेच नागरिक येथे येत आहेत. यामधील ४० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. परंतु ६० टक्के निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांना पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तिंपासून धाेका संभवत आहे. येथे काेणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नाही.
प्रशासनाने लक्ष देऊन चाचणीच्या ठिकाणी काेराेना नियमांचे पालन केले जाईल, या पध्दतीने अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. काेराेना चाचणी केली जात असलेल्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांच्यावतीने सुध्दा मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले. तरी नागरिकांनीही काेराेना नियमांचे पालन करुन आपली काेराेना चाचणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
-------------
गर्दी टाळण्याचे आराेग्य विभागाचे आवाहन
काेराेना चाचणीकरिता येणाऱ्या नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे तसेच विनाकारण गर्दी करु नये. चाचणीसाठी जाे वेळ लागताे ताे लागणारच असल्याने संयम ठेवून काेराेना चाचणी करुन घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गर्दीमुळे काेराेना संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घ्यावी.