महा-ई-सेवा केंद्रात होतेय दाखल्यांसाठी गर्दी

By admin | Published: July 5, 2014 10:47 PM2014-07-05T22:47:29+5:302014-07-05T23:52:26+5:30

विविध शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रातील गर्दी वाढली

The crowds for the Pro-Maha-e-Seva centers | महा-ई-सेवा केंद्रात होतेय दाखल्यांसाठी गर्दी

महा-ई-सेवा केंद्रात होतेय दाखल्यांसाठी गर्दी

Next

मालेगाव : दहावी बारावीचा निकाल लागला. विविध योजनांसाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याची लगबग, विविध शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रातील गर्दी वाढली असून सर्वच ठिकाणच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये झुंबड उडालेली दिसत आहे.
विद्यार्थ्यांची महा-ई-सेवा केंद्रात गर्दी वाढली त्यातच पंचायत समिती व तहसील कार्यालयातील विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करणे, शेतकर्‍यांसाठी पिक कर्जाचे, पुर्नगठणाचे, विमा साठीचे लागणारी शेतकर्‍यांसाठी कागदपत्रांचे गोळा करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रात गर्दी वाढतांना दिसत आहे. दररोज हजारो अर्ज येत आहेत. महा-ई-सेवा केंद्रात ८ अ, ७,१२, सर्व साधारण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, आधार अपडेशन, इत्यादी प्रिंन्ट जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणपत्र, राजिव गांधी जिवन दायी योजना, नविन आधार नोंदणी, नॅशनलिटी, डोमासाईल, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलीयर, प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, पत दाखला, वारसा प्रमाणपत्र, सांस्कृतीक कार्यक्रम प्रमाणपत्र, गौण खनिज, वारस प्रमाणपत्र, सांस्कृतीक कार्यक्रम प्रमाणपत्र, गौणखनिज, दगड खाणपटटा, परवाना यासह अनेक प्रमाणपत्रे, तहसील कार्यालयातून मिळत असल्याने विद्यार्थी व नागरिकांनी एकच झुंबड केली.

Web Title: The crowds for the Pro-Maha-e-Seva centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.