ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:51+5:302021-03-13T05:16:51+5:30

................. दिवसभर गर्दी; सायंकाळी सामसूम वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ...

Crowds for senior citizens to be vaccinated | ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी

ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी

Next

.................

दिवसभर गर्दी; सायंकाळी सामसूम

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सायंकाळी सर्वत्र सामसूम दिसून येत आहे; मात्र दिवसभर गर्दी कायम राहत असल्याने भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

.................

वसुली पथकाची घरोघरी धडक

जऊळका रेल्वे : विद्युत देयकाची रक्कम थकीत असलेल्या घरगुती ग्राहकांच्या घरी महावितरणच्या वसुली पथकाकडून भेटी दिल्या जात आहेत. या माध्यमातून दोनच दिवसांत लाखो रुपयांची वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.

......................

नव्या आययूडीपीत कंटेनमेंट झोन

वाशिम : शहरातील नव्या आययूडीपी परिसरातील घरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. गृह विलगीकरणातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

.......................

ग्रामीण भागात मोफत रुग्ण तपासणी

वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, बालक व इतर रुग्णांची मोफत तपासणी व औषध वितरित करण्यात येते. याअंतर्गत १३ मार्च रोजी पेडगाव, खडकी ढंगारे, दापुरी वसान येथे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

..................

नियम तोडणा-यांवर धडक कारवाई

वाशिम : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. असे असताना घालून दिलेले नियम तोडले जात आहेत. अशाच काही नागरिकांवर पोलिसांनी शुक्रवारी पुसद रस्त्यावर उभे राहून दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आले.

Web Title: Crowds for senior citizens to be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.