हयातीच्या दाखल्यासाठी ज्येष्ठांची कोरोना काळातही गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:23+5:302021-02-27T04:55:23+5:30

जिल्ह्यात श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजनेचे एकूण लाभार्थी ९० हजारांच्या आसपास आहेत. ...

Crowds of seniors even during the Corona period for proof of survival | हयातीच्या दाखल्यासाठी ज्येष्ठांची कोरोना काळातही गर्दी

हयातीच्या दाखल्यासाठी ज्येष्ठांची कोरोना काळातही गर्दी

Next

जिल्ह्यात श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजनेचे एकूण लाभार्थी ९० हजारांच्या आसपास आहेत. शासनाने २० ऑगस्ट, २०१९च्या शासन निर्णयान्वये मानधनात वाढही केलेली आहे. दरम्यान, शरीराने थकलेल्या या वृद्ध लाभार्थींना मानधन सुरू ठेवण्याकरिता दरवर्षी मार्चअखेर ते हयात असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रशासनाकडे सुपुर्द करावे लागते. यासाठी दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच जिल्ह्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्रांवर वृद्ध नागरिकांची हयातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाल्याने बहुतांश वृद्ध नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसत आहे. मात्र, पुढचे मानधन मिळणार नाही, या धास्तीने वृद्ध निराधारांची तहसीलवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

........................

कोरोनाशी कसे लढणार?

वृद्ध नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने, त्यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा लवकर होते. यामुळे शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. मात्र, ते अशक्य असल्याचे दिसून येत आहे.

हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिवसभरातून अनेक वेळा तहसीलवर गर्दी होत आहे. वृद्धांच्या तोंडावर मास्कऐवजी रुमाल बांधल्याचे पाहावयास मिळत आहे.

कोरोना संसर्गापासून बचावाकरिता वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, वृद्ध नागरिकांसाठी ही सोय तहसीलमध्ये उपलब्ध करण्यात आलेली नाही.

...............

९०,०००

जिल्ह्यातील लाभार्थी

३५,०००

श्रावणबाळ निराधार

२७,०००

संजय गांधी निराधार

२३,०००

..........................

कोट :

श्रावणबाळ, संजय गांधी आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थींना ते हयात असल्याचे प्रमाणपत्र एका साध्या कागदावर मार्चअखेरपर्यंत सादर करावे लागणार आहे. तेव्हाच पुढचे मानधन सुरू ठेवता येणे शक्य आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.

- कैलास देवळे

नायब तहसीलदार, वाशिम

Web Title: Crowds of seniors even during the Corona period for proof of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.