लागवड खर्च वाढतोय; हमीभाव कमी मिळतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:28 PM2020-11-04T17:28:04+5:302020-11-04T17:28:14+5:30
Washim Agriculture News नैसर्गिक व मानवी अशा दुहेरी संकटासमोर शेतकरी हतबल ठरत असल्याचे दिसून येते.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रासायनिक खते, किटकनाशके, बियाण्यांच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत असल्याने शेतीचा लागवड खर्च वाढत आहे. खते, किटकनाशकाच्या तुलनेत शेतमालाच्या हमीभावात अल्प वाढ होत असल्याने शेतकºयांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. नैसर्गिक व मानवी अशा दुहेरी संकटासमोर शेतकरी हतबल ठरत असल्याचे दिसून येते. :
नैसर्गिक व मानवी संकटांच्या मालिकेतून स्वत:ला सावरत शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने काळ्या मातीत राबतो. रासायनिक खते, किटकनाशके व बियाण्याच्या किंमतीत दरवर्षी वाढ होते. शेतमालाच्या हमीभावातही वाढ होते. परंतू, ही वाढ खते, किटकनाशके व बियाण्याच्या तुलनेत कमी असल्याने लागवड खर्च वजा जाता फारसे उत्पन्न हाती येत नसल्याचा दावा शेतकºयांनी केला. गत चार वर्षात खते, बियाणे व किटकनाशकाच्या किंमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली. त्यातुलनेत शेतमालाच्या हमीभावात अल्प वाढ झाली. त्यामुळे शेतीच्या लागवड खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येते.
शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागते. खते, बियाणे, किटकनाशक, मजुरीचे दर हे दरवर्षी प्रचंड वाढत आहेत. त्यातुलनेत शेतमालाच्या हमीभावात वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल ठरत आहे.
-आकातराव सरनाईक, प्रगतशील शेतकरी
किटकनाशक, खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने शेतीच्या लागवड खर्चातही वाढ होते. किटकनाशक, खताच्या वाढत्या किंमती लक्षात घेता याप्रमाणातच शेतमालाच्या हमीभावात वाढ होणे अपेक्षीत आहे.
- संतोष लाड, प्रगतशील शेतकरी