चारा पिकांची लागवड नगण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:43 AM2021-02-09T04:43:24+5:302021-02-09T04:43:24+5:30
.............. पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण वाशिम : जलसंपदा विभागाने यंदा ४५ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले. ...
..............
पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण
वाशिम : जलसंपदा विभागाने यंदा ४५ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यापोटी ६० लाखांच्या पाणीपट्टीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. ते बहुतांशी पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली.
................
परवानगीअभावी ‘भारत नेट’ची कामे थांबली
वाशिम : भारत नेट प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात ३४६ ग्रामपंचायतींना हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार आहे. मात्र, काही ठिकाणी वनविभागाची परवानगी नसल्याने कामे थांबली आहेत.
...............
जैववैद्यकीय कचरा उघड्यावर
वाशिम : ‘बायोमेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्यासंदर्भात ठोस सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रुग्णालयांमधून दैनंदिन बाहेर पडणारा जैववैद्यकीय कचरा उघड्यावरच टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.
................
समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिकांचे निवेदन
किन्हीराजा : वाढत्या महागाईच्या पृष्ठभूमीवर निराधार, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.
.............
धूम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असली, तरी शहरात त्याचे उल्लंघन होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तथा पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी दीपक आंबेकर यांनी सोमवारी केली.
.................
मोकाट गुरांचा बंदोबस्त करा!
मालेगाव : वाशिम-अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मालेगाव शहरातील मुख्य चौकात मोकाट गुरे दैनंदिन ठिय्या देत आहेत. यामुळे वाहतूक प्रभावित होत असून, हा प्रश्न स्थानिक प्रशासनाने निकाली काढावा, अशी मागणी कैलास शिंदे यांनी सोमवारी केली.