मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:43 AM2021-02-09T04:43:02+5:302021-02-09T04:43:02+5:30

७ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने, ते पदमुक्त झाले आहेत. आता नगर पंचायतवर प्रशासकाची ...

Curiosity about appointment of Malegaon Nagar Panchayat Administrator! | मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता !

मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता !

Next

७ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने, ते पदमुक्त झाले आहेत. आता नगर पंचायतवर प्रशासकाची नियुक्ती निश्चित मानल्या जात आहे. पदमुक्त झालेल्या या नगर पंचायतचा कारभार प्रशासकाकडे गेला नसून, प्रशासकपदी अद्यापपर्यंत कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या पदासाठी आता कुणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता दिसत आहे. सदोष प्रभाग रचना व आरक्षणामुळे नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. स्थगितीमुळे नगर पंचायतची निवडणूकही लांबणीवर पडली असल्याने, आता या नगर पंचायतवर शासनाला प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. मुदत संपल्याने विद्यमान नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार की प्रशासक म्हणून नियुक्ती होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Curiosity about appointment of Malegaon Nagar Panchayat Administrator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.