कारंजा येथे बँक परिसरातून ग्राहकाचे ६० हजार रुपये लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:22 PM2019-09-04T18:22:48+5:302019-09-04T18:23:51+5:30

चोरट्याने ग्राहकाची दिशाभूल करून ६० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. 

The customer looted at bank premises at Karanja | कारंजा येथे बँक परिसरातून ग्राहकाचे ६० हजार रुपये लंपास 

कारंजा येथे बँक परिसरातून ग्राहकाचे ६० हजार रुपये लंपास 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा शहरातील कॅनरा व अक्सिस तसेच स्टेट बँक परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ६० हजार रुपये भरणा करण्यासाठी बँकेत आला असता चोरट्याने ग्राहकाची दिशाभूल करून ६० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. 
स्थानिक वर्धमान कॉम्प्लेस परिसरात असलेल्या कॅनरा बँकेत गौरव गणेश शंकरपुरे हे १ लाख २५ हजाराचा डीडी काढण्यासाठी आले होते. दरम्यान, काही पैसे कमी असल्याने ते जवळ असलेले ६० हजार रुपये घेऊन खाली उतरले. दुचाकी घेऊन जात असताना चोरट्याने तुझे पैसे पडले असे म्हणत गौरव शंकरपुरे यांची दिशाभूल केली. काही क्षणातच चोरट्यांनी गणेश यांच्या जवळील ६० हजार रुपये असलेली बॅग लंपास केली.  माहिती मिळताच पोलीस यंत्रणा व बँक अधिकारी अमोल उजवणे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजची पाहणी केली असता, तीन ते चार जणांच्या टोळीने ग्राहकाकडून ६० हजार रुपयाची चोरी केल्याचे दिसून आले. या ठिकाणी तीन बँकेचे व दोन इमारतींचे असे ५ सीसीटीव्ही कॅमेराचे युनिट असतानासुद्धा काय उपयोग असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: The customer looted at bank premises at Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.